

RBI allows loan on silver
Sakal
Gold and Silver Loan : आपण आतापर्यंत गोल्ड लोन च्या गोष्टी ऐकल्या आहे, अनेकदा बँकांच्या गोल्ड लोनच्या जाहिराती पाहिल्या आहेत. ज्यात आपले सोने गहाण ठेवून बँकेकडून रोख रक्कम घेतली जाते. पण, चांदीवर म्हणजेच सिल्वरवर देखील लोन मिळते अस म्हटल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र लवकरच RBI ही सुविधा आता उपलब्ध करून देणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकताच याबाबतचा 'Reserve Bank of India (Lending Against Gold and Silver Collateral) Directions, 2025' नावाचे सविस्तर परिपत्रक जाहीर केल आहे. यानुसार हे नवे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणारअसून, त्यानंतर सोन्याबरोबरच चांदीवरदेखील कर्ज घेता येणार आहे.