

Local residents within 20 km of a toll plaza can avail a ₹340 monthly toll pass for unlimited private vehicle travel.
esakal
देशभरात राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर दररोज लाखो वाहने धावतात आणि बहुतेक लोकांना टोल प्लाझावर टोल भरावा लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का की काही नियमांनुसार सामान्य नागरिक देखील टोल सवलतीचा लाभ घेऊ शकतात? जर तुमचे घर टोल प्लाझापासून २० किलोमीटर अंतरावर असेल, तर तुम्ही फक्त ३४० रुपये देऊन महिनाभर अमर्यादित प्रवासाचा आनंद घेऊ शकता.