

घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यात म्हटले आहे की, गॅस कंपन्यांनी LPG सिलिंडरच्या बुकिंगशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल लागू केले आहेत. घरगुती गॅसचा काळाबाजार रोखणे आणि वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवणे या उद्देशाने, दोन सिलिंडरच्या बुकिंगमधील कालावधी आता वाढवण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार, केंद्र सरकारने १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलिंडरची डिलिव्हरी आणि त्यानंतरच्या 'रिफिल'च्या (पुढील सिलिंडरच्या) बुकिंगमधील अनिवार्य प्रतीक्षा कालावधी २५ दिवसांवरून वाढवून ३५ दिवस केला आहे. मात्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.