

Domestic LPG Cylinder Price Remains Unchanged
esakal
सणासुदीच्या काळाच्या अगदी तोंडावर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका बसला आहे. १ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या बदलांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. आजपासून मुंबईत व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ६३ रुपयांची वाढ झाली आहे.ती २,७०१ रुपयांवरून २,७६४ रुपयांवर पोहोचली आहे, तर घरगुती सिलिंडरची किंमत ९४१.५० रुपयांवर स्थिर आहे.