

Will There Be a Gas Cylinder Shortage During Diwali?
eSakal
Will there be an LPG cylinder shortage during Diwali: आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या गॅस वितरक संघटनांच्या आंदोलनांमुळे ऐन सणासुदीच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र ताज्या अपडेटनुसार ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. 26 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये प्रस्तावित असलेल्या आंदोलनापासून LPG वितरकांच्या दोन प्रमुख संघटनांनी दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दिवाळीच्या काळात देशभरात गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न केला जाईल असेही ते म्हणाले आहे.