

LPG New Rule: Complete eKYC Before August 16 or Risk Losing Subsidy & Refill Benefits
eSakal
LPG Rule Update: देशभरातील LPG गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. सर्व घरगुती गॅस कनेक्शनधारकांनी 16 ऑगस्टपूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन गॅस कंपन्यांनी केले आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास ग्राहकांना गॅस रिफिल बुकिंगमध्ये अडचणी येऊ शकतात. तसेच उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याना सबसिडी मिळण्यास अडचणी येऊ शकतात तर काही प्रकरणांमध्ये घरगुती दराऐवजी व्यावसायिक दराने सिलेंडर घ्यावा लागू शकतो.