

LPG-PNG Gas Connection: LPG Cylinder Tension to End? Get PNG Gas at Home; Government Launches Big Drive, Apply Online
eSakal
Apply Online for PNG Gas at Home via MyPNG: सध्याच्या जागतिक घडामोडींमुळे LPG गॅसबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच दर महिन्याला LPG सिलेंडर बुक करणे, त्याची डिलिव्हरी कधी मिळणार याची वाट पाहणे आणि सिलेंडर संपण्यापूर्वीच पुढील बुकिंग करण्याची चिंता अनेक कुटुंबांना असते. मात्र, आता सरकार या समस्येवर पर्याय म्हणून घराघरात पाइपलाइनद्वारे गॅस पोहोचवण्यावर भर देणार आहे. यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (PNGRB) ‘National PNG Drive 3.0’ सुरू केले आहे.