
1 डिसेंबरपासून एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. देशभरातील व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये 18.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याचा फटका फक्त व्यावसायिक सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना बसला आहे. मात्र, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.