
L&T Chairman Salary: लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एसएन सुब्रमण्यन यांनी 2023-24 मध्ये एकूण 51 कोटी पगार घेतला आहे. द न्यू इंडियन एक्स्प्रेसनुसार, सुब्रमण्यन यांचा पगार L&T च्या कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगाराच्या 534.57 पट आहे.
2023-24 साठी एस.एन. सुब्रह्मण्यम यांचे एकूण वेतन 51 कोटी रुपये होते. यामध्ये बेस सॅलरी 3.6 कोटी रुपये, विविध सुविधांसाठी 1.67 कोटी रुपये, 35.28 कोटी रुपये कमिशन आणि 10.5 कोटी रुपये निवृत्तीवेतन लाभ या गोष्टींचा समावेश त्यांच्या पगारात आहे.