
Maharashtra Health Budget 2025: आज 2025-26 आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. महायुती सरकारचा नव्या सरकारमधील हा पहिला अर्थसंकल्प असून राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी यावर्षी सलग अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी शिक्षण, कला, नोकरी, विज्ञान, कृषीविषयक घोषणांसह आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.