

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis chairs a meeting with representatives of the All India Kisan Sabha to discuss farmer loan issues, drought relief, crop insurance, and other public welfare demands
esakal
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची कर्जाची समस्या, पीक विमा, महिला लाभार्थी आणि विविध कर्मचारी वर्गांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. अखिल भारतीय किसान सभेने मांडलेल्या विविध मागण्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. नवीन पीक कर्ज देताना सिबिलची अट लागू करू नये, यासाठी रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून सर्व बँकांना पत्र पाठवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानात वाढ करण्याबाबतही चर्चा होणार आहे.