
MahaRERA Registration: महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (महारेरा) ने 18,693 मालमत्ता ब्रोकरची नोंदणी रद्द केली आहे. कारण त्यांनी त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण केले नाही आणि आवश्यक प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र पूर्ण केले नाही. संस्थेच्या निर्णयामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात अधिक पारदर्शकता येईल असे तज्ज्ञांचे मत आहे.
ज्या एजंट्सची नोंदणी रद्द करण्यात आली आहे, त्यात मुंबई शहरातील सुमारे 2,463 , मुंबई उपनगरीय भागातील 5,538 , ठाण्यातील 4,303 आणि पुण्यातील 3,476 एजंट्सचा समावेश आहे.