
Mahua Moitra Swiggy: मोदी सरकारवर नेहमीच हल्लाबोल करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आता स्विगीशी पंगा घेतला आहे. हा सारा गदारोळ आइस्क्रीमवरून झाला आहे. महुआ मोइत्रा यांनी X वर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये, स्विगीला टॅग करताना, त्यांनी तक्रार केली आहे की, त्यांनी महागड्या आईस्क्रीमची ऑर्डर केली होती पण त्यांना आईस्क्रीम अतिशय खराब स्थितीत मिळाले.