Manba Finance IPO : मनबा फायनान्स आणणार आयपीओ, तयारी सुरु...

एनबीएफसी कंपनी मनबा फायनान्स (Manba Finance) लवकरच आपला आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने यासाठी मार्केट रेगुलेटर सेबीकडे (SEBI ड्राफ्ट पेपर्स सादर केले आहेत.
Manba Finance to bring IPO preparations begin share market investment
Manba Finance to bring IPO preparations begin share market investment Sakal

Manba Finance IPO : एनबीएफसी कंपनी मनबा फायनान्स (Manba Finance) लवकरच आपला आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने यासाठी मार्केट रेगुलेटर सेबीकडे (SEBI ड्राफ्ट पेपर्स सादर केले आहेत.

या आयपीओ अंतर्गत पुर्णतः फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. यात कोणत्याही प्रकारचे ऑफर फॉर सेल (OFS) नसेल. याचा अर्थ आयपीओमधून मिळणाऱ्या पुर्ण निधीचा वापर कंपनी करेल. ड्राफ्ट पेपर्सनुसार आयपीओअंतर्गत 1.25 कोटी फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील.

मनबा फायनान्स 100% प्रमोटर आणि प्रमोटर्स ग्रुपच्या मालकीचे आहे. मनीष किरीटकुमार शाह यांच्याकडे कंपनीत 17.41 टक्के, त्यांची पत्नी निकिता मनीष शहा यांच्याकडे 13.29 टक्के आणि मनबा इन्व्हेस्टमेंट्स अँड सिक्युरिटीजकडे 36.92 टक्के हिस्सा आहे. हे तिघे कंपनीतील सर्वात मोठे शेअरहोल्डर्स आहेत.

ही एनबीएफसी कंपनी नवीन वाहने, वापरलेल्या कार्स, स्मॉल बिझनेस आणि पर्सनल लोन पुरवते. मनबाने सातत्याने रिस्क-वेटेड ऍसेट रेश्योसाठी (CRAR) मिनिमम कॅपिटल राखले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ते 27.02 टक्के आणि सप्टेंबर आर्थिक वर्ष 2024 मध्ये संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत 26.62 टक्के होते.

मनबा फायनान्स या फायनान्शियल सॉल्यूशन प्रोवायडरचे नेट प्रॉफिट आर्थिक वर्ष 2023 मध्ये 70.2 टक्क्यांनी वाढून 16.58 कोटीवर पोहोचला आहे. याच कालावधीत नेट इंटरेस्ट इन्कम 46.1 टक्क्यांनी वाढून 69.5 कोटी झाले. नेट इंटरेस्ट मार्जिन आर्थिक वर्ष 2022 मध्ये 9.28 टक्क्यांवरून आर्थिक वर्ष 2023 मध्ये 12.31 टक्क्यांपर्यंत वाढले.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये एसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) 633.7 कोटी होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत 27.80 टक्क्यांनी वाढली आहे. पण ते आर्थिक वर्ष 2021 च्या तुलनेत 6.47 टक्क्यांनी घसरून 495.8 कोटी झाले. सप्टेंबर आर्थिक वर्ष 2024 ला संपलेल्या सहा महिन्यांत निव्वळ नफा 16.8 कोटी, निव्वळ व्याज उत्पन्न 38.65 कोटी आणि एकूण उत्पन्न 88.3 कोटी, तर एसेट अंडर मॅनेजमेंट 733.7 कोटी होते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com