
Medical Expenses Surge: भारतीय आरोग्य क्षेत्र वेगाने वाढत आहे. रोबोटिक शस्त्रक्रिया, आधुनिक रुग्णालये, प्रगत यंत्रे आणि औषधे यामुळे आरोग्य सेवांचा विस्तार झाला. पण, यासोबतच उपचारांचा खर्चही वाढला आणि अवघ्या 12 वर्षांत शस्त्रक्रियेचा खर्च 250 ते 300 टक्के महाग झाला आहे. अर्थात, आरोग्य विमा कंपन्या या महागड्या उपचारांचा खर्च उचलण्यास तयार नाहीत कारण आरोग्य विम्याचा खर्च या तुलनेत खूपच कमी आहे.