Mehul Choksi Arrested : पीएनबीच्या १३,५०० कोटींच्या घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्झियममध्ये अटक, भारतात आणले जाणार
PNB Scam : मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेकडून १३,५०० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता आणि अटक टाळण्यासाठी तो भारतातून बेल्जियमला पळून गेला होता. येथे तो त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत अँटवर्पमध्ये राहत होता.
पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील फरार आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये पोलिसांनी अटक केली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या अपीलवरून ६५ वर्षीय चोक्सी याला शुक्रवारी (११ एप्रिल २०२५) अटक करण्यात आली.