सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार! फिचने व्यक्त केला विश्वास

Narendra Modi in 2024: अमेरिकन रेटिंग एजन्सी फिचने लोकसभा निवडणुकीबाबत अंदाज व्यक्त केला आहे.
modi government To Most Likely Retain Power In 2024 Lok Sabha Elections says Fitch Ratings
modi government To Most Likely Retain Power In 2024 Lok Sabha Elections says Fitch Ratings Sakal

Narendra Modi in 2024: अमेरिकन रेटिंग एजन्सी फिच रेटिंग्सचा अंदाज आहे की पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार पुन्हा जिंकण्याची शक्यता आहे. मंगळवारी एका निवेदनात आगामी लोकसभा निवडणुकीबाबत अंदाज व्यक्त करताना फिच रेटिंग्सने सांगितले की, सध्याचे सरकार परत येण्याची जास्त शक्यता असल्याने, धोरणातील सातत्य भारतात राहण्याची अपेक्षा आहे.

सरकारला निवडणुकीत मिळणारे बहुमत हे सरकार आपल्या सुधारणांच्या अजेंड्यावर किती महत्त्वाकांक्षीपणे पुढे जाण्यास सक्षम आहे हे ठरेल.

रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की, “भारत आणि बांगलादेशमध्ये सध्याचे सरकार सत्तेवर राहील असे आमचे मत आहे. भारतात पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये आणि बांगलादेशमध्ये जानेवारीत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.''

modi government To Most Likely Retain Power In 2024 Lok Sabha Elections says Fitch Ratings
Chicken Prices: पोल्ट्री उद्योगाची चिंता वाढली! चिकनच्या भावात मोठी घसरण; काय आहे कारण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकार सध्या दुसऱ्या कार्यकाळ पूर्ण करत आहे. हे सरकार 2014 मध्ये पहिल्यांदा निवडून आले आणि 2019 मध्येही या सरकारची सत्ता कायम राहिली. मोदी सरकार पुन्हा निवडणुका जिंकण्यात यशस्वी ठरले तर मोदी सरकारची ती सलग तिसरी टर्म असेल.

रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की, भारत आणि बांगलादेशमध्ये सध्याचे सरकार सत्तेवर राहील असे आमचे मत आहे. भारतात पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये आणि बांगलादेशमध्ये जानेवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. फिचने भारताला 'BBB-' रेटिंगसह स्थिर दृष्टीकोन ठेवला आहे.

modi government To Most Likely Retain Power In 2024 Lok Sabha Elections says Fitch Ratings
PMJDY: प्रधानमंत्री जन-धन खात्यांची संख्या 51 कोटींवर; एकूण डिपॉजिट्स 2 लाख कोटींच्यावर

रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की आशियाई क्षेत्रातील रेटिंग पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या जवळपास निम्म्या देशात 2024 मध्ये संसद किंवा अध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत.

पाकिस्तान आणि श्रीलंकामधील निवडणूक निकालांचा या देशांच्या क्रेडिट प्रोफाइलवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचे कारण हे दोन्ही देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणाऱ्या मदत पॅकेज कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com