MS Dhoni Investment
esakal
महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, धोनी आता केवळ क्रिकेटपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याने विविध व्यवसायांमध्येही गुंतवणूक केली आहे. यातीलच एका कंपनीचा लवकरच शेअर बाजारात प्रवेश होणार आहे. ही कंपनी म्हणजे चेन्नईस्थित ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्रातील गरुड एरोस्पेस. धोनीच्या गुंतवणुकीमुळे या कंपनीच्या आयपीओकडेही लक्ष लागलं आहे.