
Mukesh Ambani Right Hand: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे विश्वासू आणि वरिष्ठ अधिकारी प्रकाश शाह यांनी अचानक सर्व भौतिक सुखसुविधा सोडून संन्यासाचा मार्ग स्वीकारला आहे. शाह यांचा वार्षिक पगार जवळपास 75 कोटी होता, तरीही त्यांनी ही प्रतिष्ठित नोकरी सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. आता ते आणि त्यांची पत्नी नैना शाह दोघंही जैन परंपरेनुसार संन्यस्त जीवन जगत आहेत.