

Jio Coin Reliance Jio: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील Jio Platformsने अलीकडेच इंटरनेट टेक्नोलॉजी कंपनी Polygon Labs सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. JioCoinची इंटरनेटवर तुफान चर्चा आहे आणि त्याचे स्क्रीनशॉट देखील शेअर होत आहेत.
अनेक युजर्सनी ट्विटरवर JioCoin चे फोटो शेअर केले आहेत, तर कंपनीने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. बिटिनिंगचे सीईओ काशिफ रझा यांनीही ही माहिती शेअर केली आहे.