
मुंबई - सातत्याने चढता आलेख नोंदविणारी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक नोव्हेंबरमध्ये तब्बल ७५ टक्क्यांनी घटली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्येही नोव्हेंबरमध्ये १४ टक्के घट झाली असून, सातत्याने विक्रमी वाढ नोंदविणाऱ्या ‘एसआयपी’मध्येही मोठी घसरण झाली असल्याचे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अॅम्फी) म्हटले आहे.