Government Scheme : ५ वर्षांत ७० लाख मिळवायचेत ? या सरकारी योजनेत गुंतवणूक करा

१ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर तुम्हाला पाच वर्षांत किती रक्कम मिळेल याची संपूर्ण गणना येथे दिली आहे.
Government Scheme
Government Scheme google

मुंबई : लहान बचत योजना सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानल्या जातात. यामध्ये चांगली रक्कम गुंतवल्यास पाच वर्षं किंवा त्याहून अधिक कालावधीत चांगली रक्कम मिळवता येते. अल्पबचत योजनेंतर्गत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, NSC, सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांसारख्या योजनांचा समावेश आहे.

जर तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये पाच वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. या मॅच्युरिटीवर तुम्हाला ७.७% वार्षिक व्याज मिळू शकते. यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही, तुम्ही तुम्हाला हवी तेवढी रक्कम गुंतवू शकता. (national saving certificate government scheme)

Government Scheme
Icecream Headache : आईस्क्रीम खाल्ल्यावर डोकेदुखी होत असेल तर काय कराल ?

१ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर तुम्हाला पाच वर्षांत किती रक्कम मिळेल याची संपूर्ण गणना येथे दिली आहे.

कर लाभ देखील उपलब्ध आहेत

ही योजना सरकार चालवते. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना खात्रीशीर परतावा मिळतो. यासोबतच इतर अनेक सुविधांचा लाभही दिला जातो. यामध्ये कराची बचत होते. या अंतर्गत वर्षाला १.५ लाख रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. आयकर विभागाच्या कलम ८० सी अंतर्गत ही सूट देण्यात आली आहे.

Government Scheme
Indian Navy : भारतीय नौदलात अग्निविरांची भरती; १२वी उत्तीर्णांना संधी

१ लाख ते ५० लाख गुंतवणुकीवर किती रक्कम मिळेल ?

  • तुम्ही रु. १ लाख गुंतवल्यास तुम्हाला रु. ४४ हजार ९०३ व्याज आणि पाच वर्षात रु. १.४४ लाख मिळतील.

  • ५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांत 2.24 लाख रुपयांचे व्याज मिळेल आणि एकूण रक्कम 7.24 लाख रुपये असेल.

  • तुम्ही रु. 10 लाख गुंतवल्यास, तुम्हाला रु. 4.49 लाख व्याज आणि रु. 14.49 लाख एकूण कॉर्पस पाच वर्षात मिळतील.

  • 20 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर एकूण 8.98 लाख रुपये व्याज आणि मॅच्युरिटीनंतर एकूण रक्कम 28.98 लाख रुपये होईल.

  • पाच वर्षांनंतर, 30 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 13.47 लाख रुपयांचे व्याज दिले जाईल आणि मॅच्युरिटीनंतरची एकूण रक्कम 43.47 लाख रुपये असेल.

  • जर 40 लाख रुपये पाच वर्षांसाठी गुंतवले तर एकूण कॉर्पस रुपये 57.96 लाख होईल, ज्यामध्ये 17.96 लाख रुपये व्याज मिळेल.

  • 50 लाख रुपये गुंतवल्यास, मॅच्युरिटीवर रक्कम 72.45 लाख रुपये असेल, ज्यामध्ये एकूण 22.45 लाख रुपये व्याज असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com