Income Tax Data: देशातील 50 टक्के लोकसंख्येकडे पॅनकार्ड; पुरुष आणि महिला यांच्यातील दरी होतेय कमी

Income Tax Data: आधार कार्डानंतर कोणते महत्त्वाचे कागदपत्र असेल तर ते पॅन कार्ड आहे. आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून केला जातो तर पॅन कार्डचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी केला जातो.
Nearly half of population now have PAN, male-female ratio coming down, show I-T dept data
Nearly half of population now have PAN, male-female ratio coming down, show I-T dept data Sakal

Income Tax Data: आधार कार्डानंतर कोणते महत्त्वाचे कागदपत्र असेल तर ते पॅन कार्ड आहे. आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून केला जातो तर पॅन कार्डचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी केला जातो. पॅन कार्डचा वापर बँकिंग व्यवहार किंवा आयटीआर भरण्यासाठी केला जातो. पॅन कार्ड तुमची आर्थिक स्थिती कशी आहे हे देखील दाखवते.

पॅन कार्डच्या मदतीने बँकांना कर्ज घेणाऱ्या ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर कळतो. त्याचबरोबर पॅनकार्डशिवाय कोणतेही मोठे व्यवहार किंवा शेअर बाजारातील शेअर्सची खरेदी-विक्रीही करता येत नाही. त्याचबरोबर पॅनकार्डच्या मदतीने विमा पॉलिसी, ईपीएफचे पैसे, पेन्शन यांसारखी महत्त्वाची कामे केली जातात. यातच आता पॅन कार्डधारकांची संख्या वाढली आहे.

प्राप्तिकर विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की भारतातील जवळपास निम्म्या लोकसंख्येकडे PAN क्रमांक आहे. अहवालानुसार पुरुष आणि महिला पॅन धारकांच्या संख्येतील अजूनही अंतर आहे. 31 मार्च 2024 पर्यंत 42.10 कोटी पुरुषांकडे पॅनकार्ड आहे तर 31.05 कोटी महिलांकडे पॅनकार्ड आहे. अहवालात म्हटले आहे की 14 कोटी पेक्षा जास्त पॅन वापरात नसल्याचा धोका आहे कारण ते आधारशी जोडलेले नाहीत.

Nearly half of population now have PAN, male-female ratio coming down, show I-T dept data
Raymond Group: कंपन्यांच्या संचालक मंडळातून नवाज मोदींची हकालपट्टी; गौतम सिंघानियांवर केला आणखी एक आरोप

पॅन धारकांच्या वाढीची कारणे काय आहेत?

  • विविध आर्थिक व्यवहारांमध्ये पॅन अनिवार्य आहे

  • टीडीएससाठी पॅन आवश्यक आहे.

  • प्राप्तिकर ॉनियम 114(B) 18 प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना PAN कार्ड अनिवार्य आहे.

  • महिला गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ झाल्यामुळेही पॅन धारकांच्या संख्येत वाढ झाल्याचे कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे स्त्री-पुरुषांमधील दरी कमी झाली आहे.

  • 74.67 कोटी पॅनपैकी, 31 मार्च 2024 पर्यंत 60.5 कोटी पेक्षा जास्त आधारशी जोडले गेले आहेत. अनिवार्य पॅन-आधार लिंकेजमुळे मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट पॅन काढून टाकण्यात मदत झाली.

Nearly half of population now have PAN, male-female ratio coming down, show I-T dept data
Gen Z Loosing Jobs : धक्कादायक! नव्याने पदवीधर झालेल्या तरूणांच्या नोकऱ्या धोक्यात; काय आहे कारण?

आयकर विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे जे करदात्याला माहित असणे आवश्यक आहे. पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.

तुमचा परमनंट अकाउंट नंबर (PAN) तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला नसेल, तर लगेच लिंक करा अन्यथा TDS दुप्पट भरावा लागेल. तुम्हाला हे नुकसान टाळायचे असेल तर 31 मे पर्यंत तुमचे आधार पॅनशी लिंक करा. आयकर विभागाने म्हटले आहे की, जर करदात्यांनी 31 मे पर्यंत त्यांचे पॅन आधारशी लिंक केले तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com