Gold-Silver Vs Sensex-Nifty: सोन्या-चांदीची चमक सेन्सेक्स-निफ्टीवर भारी; काय आहे कारण?

Gold-Silver Vs Sensex-Nifty Return: 2024 हे वर्ष केवळ शेअर बाजारासाठीच नव्हे तर सराफा बाजारासाठीही दररोज नवा इतिहास रचत आहे. शेअर बाजार वधारला की सोन्या-चांदीच्या भावात घसरण होते, असे सर्वसाधारणपणे मानले जाते
Gold-Silver Vs Sensex-Nifty
Gold-Silver Vs Sensex-NiftySakal

Gold-Silver Vs Sensex-Nifty Return: 2024 हे वर्ष केवळ शेअर बाजारासाठीच नव्हे तर सराफा बाजारासाठीही दररोज नवा इतिहास रचत आहे. शेअर बाजार वधारला की सोन्या-चांदीच्या भावात घसरण होते, असे सर्वसाधारणपणे मानले जाते, परंतु यावेळी तसे होताना दिसत नाही. सोन्या-चांदीसोबतच सेन्सेक्स आणि निफ्टीही रेकॉर्डब्रेक कामगिरी करत आहेत. या शर्यतीत सोन्या-चांदीने सेन्सेक्स आणि निफ्टीला मागे टाकले आहे.

जर आपण वार्षिक आधारे परताव्याची तुलना केली तर, या वर्षी आतापर्यंत सोन्याने आपल्या गुंतवणूकदारांना 13 टक्के परतावा दिला आहे, तर चांदीने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 8 टक्के परतावा दिला आहे. दुसरीकडे, भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांपैकी NSE निफ्टी 4.65 टक्क्यांनी वधारला आहे, BSE सेन्सेक्स 3.83 टक्क्यांनी वधारला आहे, तर बँक निफ्टी निर्देशांक या वर्षी सुमारे 1.56 टक्क्यांनी वधारला आहे.

Gold-Silver Vs Sensex-Nifty
Swiggy Order: रमजानच्या पवित्र महिन्यात स्विगीमधून 'या' पदार्थाला सर्वाधिक मागणी; कोणते शहर आघाडीवर?

सोन्या-चांदीचे भाव का वाढत आहेत?

यूएस फेडच्या दरात कपात आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी सुरू ठेवल्याची चर्चा यामुळे सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. याशिवाय, मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणावासारख्या जागतिक अनिश्चिततेशी संबंधित घटकांनी सराफा बाजारातील तेजीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

2024 मध्ये सोन्या-चांदीच्या भावात झालेल्या वाढीबद्दल, एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा म्हणाल्या, “सोन्यात आतापर्यंत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर चांदीमध्ये 8 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स अनुक्रमे 4.7 टक्के आणि 4 टक्के परतावा देऊन चांगली कामगिरी केली आहे.

Gold-Silver Vs Sensex-Nifty
Electoral Bonds: SBIने आरटीआय कायद्यांतर्गत निवडणूक रोख्यांची माहिती देण्यास दिला नकार; काय आहे कारण?

त्या पुढे म्हणाल्या, “भू-राजकीय अनिश्चितता आणि जागतिक आर्थिक वाढीच्या मंदावलेल्या चिंतेमध्ये सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. उद्योगांमधील वाढती मागणी, हरित ऊर्जा उपक्रम आणि बाजारातील दबाव यामुळे चांदीलाही मागणी वाढत आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com