
Who is Maya Tata: रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहात अनेक बदल होत आहेत. टाटा ट्रस्टची सूत्रे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्या हातात आली. आता त्यांच्या दोन्ही मुलींवरही मोठी जबाबदारी आली आहे. खरं तर, नोएल टाटा यांच्या दोन मुली माया टाटा आणि लीह टाटा यांचा सर रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूटच्या (SRTII) विश्वस्त मंडळात समावेश करण्यात आला आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर बोर्डात मोठे बदल करण्यात आले आहेत.