Narayana Murthy: 70 तासांच्या वक्तव्यानंतर आता नारायण मूर्ती म्हणाले, ''काहीही फुकट देऊ नये, मी पण....''

Narayana Murthy On Freebie : नारायण मूर्ती आठवड्यातून 70 तास काम करण्याच्या विधानानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Narayana Murthy
Narayana MurthySakal

Narayana Murthy On Freebie : इन्फोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायण मूर्ती आठवड्यातून 70 तास काम करण्याच्या विधानानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, आता ते म्हणाले की काहीही फुकट देऊ नये. नारायण मूर्ती बेंगळुरू येथील टेक समिट 2023 कार्यक्रमात बोलत होते.

निवडणुकीत राजकीय पक्षांनी मोफत देण्याच्या आश्वासनांवर एनआर नारायण मूर्ती म्हणाले की, काहीही विनामूल्य देऊ नये. सरकारकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि अनुदानाचा लाभ घेणाऱ्या लोकांनी समाजाच्या भल्यासाठी हातभार लावावा, अशी सूचनाही त्यांनी केली. भारतासारख्या गरीब देशाला समृद्ध राष्ट्र बनवण्यासाठी उदारमतवादी भांडवलशाही हा एकमेव पर्याय असल्याचे मूर्ती यांनी सांगितले.

उदाहरण देताना मूर्ती यांनी सांगितले की, मी तुम्हाला मोफत वीज देईन, असे तुम्ही म्हणत असाल तर ही सरकारसाठी खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही हेही सांगायला हवे की जर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती 20 टक्क्यांपर्यंत पोहोचली तर आम्ही तुम्हाला या सुविधा देऊ.

Narayana Murthy
Hinduja Group: आयकर विभागाच्या रडारवर हिंदुजा समूह, मुंबईसह अनेक शहरांत सर्च ऑपरेशन सुरु, काय आहे प्रकरण?

नारायण मूर्ती पुढे म्हणाले, मी मोफत सेवा देण्याच्या विरोधात नाही. मला हे चांगले समजते कारण मी एका गरीब पार्श्वभूमीतून आलो आहे. पण मला असे वाटते की मोफत सुविधांचा लाभ घेत असलेल्या लोकांनी त्यांच्या स्वतःच्या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे.

Narayana Murthy
Life Certificate: पेन्शनधारकांनी आजच 'हे' महत्त्वाचे काम पूर्ण करा अन्यथा पेन्शन होईल बंद

नारायण मूर्ती यांनी स्वतःचे उदाहरण देताना म्हणाले की, मी मोफत सेवा देण्याच्या विरोधात नाही, कारण मी देखील एकेकाळी गरीब पार्श्वभूमीतून आलो होतो, परंतु मला वाटते की ज्यांनी मोफत सबसिडी घेतली आहे त्यांच्याकडून आपण त्या बदल्यात काहीतरी अपेक्षा केली पाहिजे.

मूर्ती यांनी आठवण करून दिली की, “मी 70 च्या दशकात विद्यार्थी म्हणून फ्रान्सला जाण्यापूर्वी मी डाव्या विचारसरणीचा होतो कारण माझे वडील समाजवादावर विश्वास ठेवणारे नेहरूंचे मोठे प्रशंसक होते."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com