
सरकारने उमंग अॅपवर EPFOच्या जवळपास सर्व सेवा उपलब्ध केल्या आहेत.
आता घरबसल्या पीएफ क्लेम, पासबुक चेक, यूएएन कार्ड डाउनलोड करता येईल.
फेस ऑथेन्टिकेशनमुळे यूएएन जनरेशन आणि अॅक्टिवेशन आणखी सुरक्षित झाले आहे.
UMANG App: तुम्ही जर EPFOचे सभासद असाल आणि क्लेम, पासबुक किंवा यूएएन कार्डसाठी ऑफिसच्या फेऱ्या मारत असाल, तर आता ही धावपळ संपणार आहे. केंद्र सरकारने उमंग अॅप (UMANG App) च्या माध्यमातून पीएफशी संबंधित जवळपास सर्व सेवा मोबाईलवर उपलब्ध करून दिल्या आहेत.