
Ola Electric Layoff: ओला इलेक्ट्रिक कंपनी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या सेल्स, मार्केटिंग, डिस्ट्रिब्युशनसह विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या सुमारे 1000 कर्मचाऱ्यांना या कपातीचा फटका बसणार आहे. मात्र, ओला इलेक्ट्रिककडून याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. कंपनी अंतर्गत स्तरावर अनेक बदल करत आहे.