
Bank Merger Update: मे महिन्यात बँकिंग क्षेत्राशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. बँकांच्या सुट्ट्या असोत किंवा एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क असो, 1 मे पासून बँकिंगशी संबंधित अनेक नियम बदलतील. सरकारने एक राज्य-एक प्रादेशिक ग्रामीण बँक धोरणाला हिरवा झेंडा दाखवला आहे. याअंतर्गत, आता 1 मे पासून 15 ग्रामीण बँकांचे विलीनीकरण होणार आहे. 1 मे पासून 43 पैकी 15 आरआरबी बँकांचे विलीनीकरण केले जाईल.