
OpenAI Copyright Case: इंडियन एक्स्प्रेस आणि हिंदुस्तान टाइम्ससह मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी दिल्ली न्यायालयात OpenAI विरुद्ध खटला दाखल केला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॉपीराइट उल्लंघनाच्या आरोपाखाली हा खटला दाखल करण्यात आला आहे. ओपनएआयने परवानगीशिवाय न्यूज वेबसाइटवरील कॉन्टेन्ट स्क्रॅप केला आणि चॅटजीपीटीमध्ये वापरला. ओपनएआयवर भारतीय डिजिटल मीडियाचा कॉन्टेन्ट परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप आहे.