Tata Group: टाटा ग्रुपला मोठा झटका! ऑक्सफर्डने करार केला रद्द, शेअर्सवर होणार परिणाम

TCS Oxford Deal: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला मोठा झटका बसला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने TCS सोबतचा करार रद्द केला आहे. संस्थेच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
Oxford terminates deal with TCS after technical glitch in admission test
Oxford terminates deal with TCS after technical glitch in admission test Sakal

TCS Oxford Deal: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) मोठा झटका बसला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने TCS सोबतचा करार रद्द केला आहे. संस्थेच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. (Why Oxford University ended its contract with TCS)

विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीच्या मदतीने आयोजित केलेल्या या वर्षीच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षांमध्ये काही उमेदवारांना तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागले, त्यानंतर टीसीएस पुढील ऑक्सफर्ड प्रवेश परीक्षा आयोजित करेल असा निर्णय घेण्यात आला. पण त्या अगोदरच ऑक्सफर्डने कंपनी सोबतचा करार रद्द केला.

दरवर्षी जगभरातून हजारो विद्यार्थी ऑक्सफर्डमध्ये प्रवेश घेण्यासाठी येतात. युनिव्हर्सिटी 30 महाविद्यालयांद्वारे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण देते. ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेतलेल्या प्रमुख भारतीयांमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांचा समावेश आहे.

Oxford terminates deal with TCS after technical glitch in admission test
Bonus Share: आयटी कंपनीमुळे गुंतवणूकदार होणार मालामाल; एका शेअरवर मिळणार 2 बोनस शेअर्स

ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यासाठी टीसीएसला गेल्या वर्षीच ऑक्सफर्ड विद्यापीठाचे पार्टनर बनवण्यात आले होते. मात्र, या पार्टनरशिपचे एक वर्षही पूर्ण होऊ शकले नाही. हा करार एप्रिल 2023 मध्ये झाला होता आणि जानेवारी 2024 मध्ये तो रद्द करण्यात आला.

ऑक्सफर्ड विद्यापीठ ऑनलाइन चाचण्यांद्वारे जगभरातील काही अर्जदारांची निवड करते. ब्रिटनच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये प्रवेश परीक्षांद्वारे त्यांना प्रवेश मिळतो. ऑक्सफर्ड विद्यापीठांतर्गत सुमारे 30 महाविद्यालये आहेत, जिथे विविध विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते.

Oxford terminates deal with TCS after technical glitch in admission test
Bank Holiday: फेब्रुवारीमध्ये 'इतक्या' दिवस बँका राहणार बंद; आरबीआयकडून सुट्ट्यांची यादी जाहीर

संस्थेने सांगितले की, "काळजीपूर्वक विचार करून तसेच उमेदवार, शिक्षक आणि परीक्षा केंद्रांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया यावर विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व उमेदवारांना चांगली सुविधा देणे हे आमचे प्राधान्य आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com