
Pakistan Tweets Plea For International Loans: भारत पाकिस्तान तणावा दरम्यान, पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अलिकडेच पाकिस्तान सरकारने संपूर्ण जगासमोर कर्जासाठी विनवणी केली आहे. पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागानुसार, भारतीय हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, आता पाकिस्तान सरकारने जगभरातील त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांकडून अधिक कर्जाची मागणी केली आहे.