

Centre Introduces Paripoorna Mediclaim Ayush Bima for Employees & Pensioners
eSakal
Paripoorna Mediclaim Ayush Bima : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचलत ‘परिपूर्ण मेडिक्लेम आयुष विमा’ सुरू केला आहे. हा विमा 'केंद्र सरकार आरोग्य योजना' (CGHS) अंतर्गत लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक हा विमा CGHS च्या पर्याय म्हणून घेऊ शकतात.