Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Pension Department: पेन्शनशी संबंधित सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये, पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक आणि सेवा संबंधित तपशील समाविष्ट केले जाऊ शकतात.
Pension department launches integrated portal for Government retirees
Pension department launches integrated portal for Government retirees Sakal

Pension Department: तुमच्या घरात पेन्शनधारक कोणी असेल किंवा तुम्ही स्वतः सरकारी नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पेन्शनधारकांच्या (जे पेन्शनचा लाभ घेतात) सोयीसाठी सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने म्हणजेच SBI ने 'इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल' नावाचे नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. जाणून घ्या काय आहे हे पोर्टल आणि त्यात कोणत्या सुविधा असणार आहेत?

'इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल' हे पोर्टल एकूण पाच बँकांच्या पेमेंट सेवा आणि पेन्शन प्रक्रिया एकाच ठिकाणी आणणार आहे. पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाच्या निवेदनात म्हटले आहे की, पेन्शन सेवा डिजिटल करण्यासाठी आणि पेन्शनधारकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

इंटिग्रेटेड पेन्शन प्लॅटफॉर्म म्हणजे काय?

पेन्शनशी संबंधित सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये, पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक आणि सेवा संबंधित तपशील समाविष्ट केले जाऊ शकतात. यासोबतच सेवानिवृत्त लोकांना त्यांच्या पेन्शन मंजूरीबाबत एसएमएस किंवा ईमेलद्वारे माहिती दिली जाईल जेणेकरून त्यांना संपूर्ण प्रक्रियेची माहिती राहील.

Pension department launches integrated portal for Government retirees
RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

पेन्शन प्रक्रिया आणि पेमेंट पूर्णपणे डिजिटल करणे हा त्याचा उद्देश आहे. यामध्ये सेवानिवृत्त व्यक्तीला त्याची कागदपत्रे ऑनलाइन जमा करण्याची, डिजीलॉकरवर पाठवण्याची आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पीपीओ जारी करण्याची सुविधा आहे.

'इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल' सुरू झाल्यानंतर, पाच बँकांशी संबंधित पेन्शन घेणारे लोक त्यांच्या पेन्शनशी संबंधित तपशील जसे की जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची स्थिती, फॉर्म-16, भरायच्या आणि प्राप्त झालेल्या रकमेचा तपशील आणि पेन्शन स्लिप पाहू शकतील.

Pension department launches integrated portal for Government retirees
Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

यावर सेवानिवृत्त कर्मचारी त्यांची मासिक पेन्शन स्लिप पाहू शकतात तसेच जीवन प्रमाणपत्र आणि फॉर्म-16 जमा करण्याची स्थिती पाहू शकतात. पूर्वी ही सुविधा फक्त SBI पेन्शनधारकांसाठी होती, परंतु आता SBI, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेचे पेन्शनधारक देखील या पोर्टलचा लाभ घेऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com