Pension Update: पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! 12 वर्षांनंतर पेन्शन वाढणार? दिल्लीत महत्त्वाची बैठक

Pension Hike Update: गेल्या 12 वर्षांपासून EPFO च्या किमान मासिक पेन्शनमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. आता 19 नोव्हेंबरला होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत 1,000 रुपयांची पेन्शन 3,000 रुपये करण्याच्या मागणीसह इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
EPFO Pension Update: Minimum Pension May Increase After 12 Years; ₹3,000 Proposal to Be Discussed

EPFO Pension Update: Minimum Pension May Increase After 12 Years; ₹3,000 Proposal to Be Discussed

eSakal

Updated on: 

Latest Pension Update: EPFO पेन्शनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे तुम्हालाही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) पेन्शन मिळत असेल, तर गुरुवार, 19 नोव्हेंबर हा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. कारण या दिवशी EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची (CBT) 240 वी बैठक होणार आहे. या बैठकीत सध्या 1,000 रुपये असलेली किमान मासिक पेन्शन वाढवून 3,000 रुपये करण्याच्या मागणीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...