

Crude Oil Falls Sharply! Check Today’s Petrol, Diesel & CNG Prices in Your City
eSakal
Petrol-Diesel Price: सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. अमेरिका आणि इराण यांनी रविवारी एकमेकांवर कोणतेही नवे हल्ले न केल्याने मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझमार्गे तेल वाहतूक पूर्ववत सुरू होईल, अशी आशा वाटत असताना ब्रेंट क्रूडचा दर 4.52 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 92.41 डॉलरवर आला.