

Petrol Diesel LPG Price: LPG Distributors Demand Rs 150 Commission Per Cylinder, Will Fuel Prices Increase?
esakal
Petrol Diesel Commission Hike: देशभरातील LPG गॅस वितरक आणि पेट्रोल पंप चालकांनी त्यांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी पेट्रोलियम मंत्रालयासह सरकारी तेल कंपन्या HPCL, IOCL आणि BPCL कडेही पाठपुरावा सुरू केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कमिशनमध्ये वाढ झालेली नाही. मात्र, कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिल, देखभाल आणि इतर खर्च सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे व्यवसाय चालवणं कठीण होत असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे.