

Petrol Prices May Rise by ₹25? Shocking Fuel Hike Warning Sparks Panic Across India
eSakal
Petrol-Diesel Price Today: पश्चिम आशियातील संघर्षाचे पडसाद आता आपल्या देशात दिसून येत आहे. कालपासून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर 3 रुपयांनी तर CNG दर 2 रुपयांनी वाढवले. याचे कारण मागच्या 3 महिन्यांपासून तेल विपणन कंपन्यांनी तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा तोटा सहन केला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी सद्य स्थितीत इंधन दरात वाढ करणे गरजेचे होते. मात्र सध्या वाढवलेली 3 रुपयांची वाढ ही पुरेशी नसून ती फक्त 12% आहे, त्यामुळे पेट्रोलचे भाव 25 रुपयांपर्यंत वाढू शकतात असे काही रीपोर्टस तसेच तज्ञांचे मत आहे. त्यामुळे सरकार टप्प्याटप्प्याने इंधन दर वाढवतील असा दावा केला जात आहे. त्यामुळे आज काय दर आहेत पाहणे महत्त्वाचे ठरते.