Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाचे भाव वाढले! CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग? पाहा महाराष्ट्रातील आजचे दर

Check Maharashtra Petrol and Diesel Rates: जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या हालचालींचा देशांतर्गत इंधन दरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. CNG दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत काय अपडेट आहे आणि महाराष्ट्रात आजचे भाव किती आहेत, जाणून घ्या.
Petrol Diesel Price Today

Crude Oil Rises After CNG Hike, Will Petrol-Diesel Prices Increase?

eSakal

Updated on

Petrol-Diesel Latest Update: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात पुन्हा वाढ झाली असून ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल 97.31 डॉलरवर आला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून अमेरिका-इराणमधील तणाव कायम असून ब्रेंट क्रूडने जुलैनंतरची सर्वोच्च पातळी गाठली आहे. त्यामुळे जर दर वाढतच राहिले तर देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलही महाग होण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्याच आठवड्यात CNG दरात वाढ झाल्याने पेट्रोल-डिझेलबाबत काय निर्णय होतो याकडे ग्राहकांचे लक्ष्य आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com