
थोडक्यात:
कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय दरांमध्ये स्थिरता राहिल्यास पुढील 2-3 महिन्यांत पेट्रोल-डिझेल दर कमी होऊ शकतात.
भारताने क्रूड ऑइल खरेदी नेटवर्क 27 देशांवरून वाढवून 40 देशांपर्यंत नेले आहे, ज्यामुळे पुरवठा सुरक्षित झाला आहे.
रशियाचा सध्या भारताच्या एकूण तेल आयातीत 40% वाटा असून, कमी दरांमुळे ग्राहकांना फायदा होण्याची शक्यता आहे.
Petrol Diesel Price Cut Soon: ग्राहकांना लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठा दिलासा मिळू शकतो. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी संकेत दिले आहेत की, जर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पुढील दोन-तीन महिने सध्याच्या पातळीवर टिकून राहिल्या, तर देशात इंधन दर कमी केले जाऊ शकतात.