

Petrol Diesel Tax: Big Decision by Central Government! Diesel Export Tax Hiked from October 31, Check Latest Petrol and Diesel Prices
eSakal
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये बदल केला असून पुढील 15 दिवसांसाठी डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) म्हणजेच विमान इंधनाच्या निर्यातीवरील कर वाढवला आहे. तर दुसरीकडे, पेट्रोलच्या निर्यातीवरील कर पूर्णपणे रद्द करून शून्य केला आहे.