
पेट्रोल पंप चालकांच्या संघटनांनी 10 मेपासून UPI आणि इतर डिजिटल पेमेंट स्वीकारणं थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील अनेक भागांत, विशेषतः विदर्भ व नाशिकमध्ये लागू होणार आहे.
पेट्रोल पंप चालकांच्या म्हणण्यानुसार, डिजिटल व्यवहारांमुळे सायबर फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक वेळा फसवणूक करणारे लोकं इतरांचे कार्ड किंवा नेटबँकिंग वापरून पेमेंट करतात आणि नंतर तक्रार करून तो व्यवहार रद्द करून घेतात. त्यामुळे पंप चालकांचे हजारो रुपयांचे नुकसान होते.