PF Withdrawal Problem After Bank Change? Here’s What You Must Do
eSakal
Personal Finance
Provident Fund: तुम्ही सॅलरी अकाउंट बदललं? ‘हे’ काम नाही केलं तर PF चे पैसे अडकू शकतात!
Provident Fund News: जेव्हा जेव्हा तुमचे सॅलरी खाते बदलते, तेव्हा EPFO मध्ये त्याची नोंद अपडेट करण्याची सवय लावा. यासाठी फक्त काही मिनिटे लागतात, पण भविष्यातील तुमचा मोठा त्रास वाचू शकतो.
Salary Account Change Impact On PF: तुम्ही तुमचे सॅलरी बँक अकाउंट बदलले आहे का? जर बदलले असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सॅलरी अकाउंट बदलणे हे अनेकदा साधे ऑफिसचे काम वाटते फक्त काही क्लिक अपडेट, नवीन डेबिट कार्ड आणि काम पूर्ण. पण ही इतकी छोटी गोष्ट नाही. कारण यामुळे तुमच्या पीएफ खात्याशी संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात, ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. चला तर मग, यामुळे नेमक्या कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यावर उपाय काय आहेत ते समजून घेऊया.

