PM Kisan Yojana: तारीख ठरली! 'या' दिवशी येणार 15 वा हप्ता, शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

PM Kisan 15th Installment Date: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
PM Kisan 15th Installment Date Know more details
PM Kisan 15th Installment Date Know more details Sakal

PM Kisan 15th Installment Date: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे PM किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याचे हस्तांतरण 15 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे.

8 कोटी शेतकऱ्यांना 15 वा हप्ता DBT द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, सर्व पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी 6,000 रुपये दिले जातात.

PM Kisan 15th Installment Date Know more details
Madras HC: ऑनलाइन रमी आणि पोकर सुरुच राहणार; मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय, तामिळनाडू सरकारला धक्का

8 कोटी शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळणार

PM किसान योजना ही जगातील सर्वात मोठ्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (सरकारी लाभ थेट त्या व्यक्तीच्या खात्यात) योजनांपैकी एक आहे. ज्यामध्ये वार्षिक तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले जातात.

PM किसानचे 15 व्या हप्त्याचे 2,000 रुपये 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. ज्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीत आहेत त्यांनाच 15 वा हप्ता दिला जाईल. अशा परिस्थितीत शेतकरी लाभार्थी यादीत नाव तपासू शकतात.

PM Kisan 15th Installment Date Know more details
Hero MotoCorp: हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाळ यांच्यावर ईडीची कारवाई, 24.95 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

ज्या शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण केले आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळेल. तसेच फॉर्ममध्ये दिलेले सर्व तपशील बरोबर असावेत. त्यामुळे अर्जात दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. तुमचे पुर्ण नाव, वडिलांचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादी तपशील चुकीचे असल्यास, तुम्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता.

अधिक माहितीसाठी संपर्क करा

पीएम किसान योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही pmkisan-ict@gov.in वर ईमेल आयडी पाठवू शकता. याशिवाय शेतकरी पीएम शेतकरी योजना हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com