PM Kisan Yojana: देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' तारखेला खात्यात येणार दोन हजार रुपये

PM Kisan Yojana update: पंतप्रधान किसान योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. पीएम किसान योजनेच्या पुढील 16व्या हप्त्याची तारीख सरकारने जाहीर केली आहे.
PM kisan 16th installment date announced 2000 rupee release on 28 February
PM kisan 16th installment date announced 2000 rupee release on 28 February Sakal

PM Kisan Yojana Installment Date: पंतप्रधान किसान योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या पुढील 16व्या हप्त्याची तारीख सरकारने जाहीर केली आहे.

28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर तारीख सांगितली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता जारी केला होता. 8 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांना 15 वा हप्ता म्हणून 18,000 कोटी रुपयांची रक्कम जारी करण्यात आली होती. (PM Kisan Yojana pm kisan 16th installment date announced how to Check status in PM Kisan scheme)

PM kisan 16th installment date announced 2000 rupee release on 28 February
Upcoming IPO 2024: पैसे तयार ठेवा! अंबानी आणि टाटा गुंतवणूकदारांना करणार मालामाल; लवकरच IPO आणणार

लाभार्थ्यांची यादी कशी तपासायची-

1. PM-Kisan pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

2. होमपेजवर 'फार्मर्स कॉर्नर' निवडा.

3. यानंतर 'लाभार्थी स्टेटस' वर क्लिक करा.

4. यानंतर तुम्ही ड्रॉप-डाउन मेनूमधून राज्य, जिल्हा, ब्लॉक किंवा गाव निवडू शकता.

5. यानंतर स्थिती जाणून घेण्यासाठी 'Get Report' वर क्लिक करा.

(Know How to Check Beneficiary List)

शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक

जर तुम्हाला पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतीही समस्या येत असेल तर तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर शेतकऱ्यांशी संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेच्या (Helpline number for farmers) हेल्पलाइन नंबर - 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. (PM Kisan Samman Nidhi Yojana: 16th instalment set for release by month-end Details here)

PM kisan 16th installment date announced 2000 rupee release on 28 February
Air India: आता विमानाने करा स्वस्तात प्रवास; एअर इंडिया एक्स्प्रेसची खास ऑफर, पण ही आहे अट

चॅटबॉट मदत करेल

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पीएम-किसान आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉट (किसान ई-मित्र) लाँच केले आहे, जे पीएम-किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करेल. हे हिंदी, तमिळ, ओडिया, बंगाली आणि इंग्रजी सारख्या स्थानिक भाषांमध्ये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com