
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून 20 वा हप्ता जाहीर केला आहे; 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात DBTद्वारे ₹2000 पाठवले आहेत.
2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना थेट ₹3 लाख कोटींपेक्षा जास्त मदत मिळाली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC अनिवार्य आहे; e-KYC नसल्यास हप्ता बंद केला जाऊ शकतो.
PM Kisan Yojana: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून ‘पीएम किसान सन्मान निधी’ (PM-KISAN) योजनेच्या 20वा हप्ता पाठवला आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित होते.