
थोडक्यात:
पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 18 किंवा 19 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी KYC, आधार लिंकिंग आणि बँक डिटेल्स अपडेट करणे आवश्यक आहे.
या वर्षी अद्याप एकच हप्ता मिळाला असून 20व्या हप्त्याकडे कोट्यवधी शेतकरी वाट पाहत आहेत.
PM Kisan 20th Installment Date: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. आतापर्यंत योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे आणि आता 20व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे.