
थोडक्यात:
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मदत दिली जाते, जी थेट बँक खात्यात DBT द्वारे जमा होते.
शेतकरी PM Kisan वेबसाइटवर आधार, मोबाइल किंवा बँक क्रमांक टाकून 20 व्या हप्त्याचा स्टेटस तपासू शकतात.
PM Kisan 20th Installment: केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता आज (शुक्रवार) जाहीर होऊ शकतो. खरीप पिकांच्या पेरणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.