
पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित होणार असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रक्कम जमा करतील.
पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात 6,000 रुपये (प्रत्येकी 2,000 रुपये, तीन हप्त्यांत) थेट बँक खात्यात मिळतात.
या हप्त्याचा लाभ सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना मिळणार असून, ही रक्कम बी-बियाणे, खत आणि शेतीच्या कामासाठी दिली जाते.
PM Kisan 20th installment date: देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राबवण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची तारीख जाहीर झाली आहे. शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून 2,000 रुपयांच्या पुढील हप्त्याची वाट पाहत होते. आता त्यांची प्रतिक्षा संपली आहे.