PM Kisan: रक्षाबंधनला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 4 हजार? व्हायरल Video वर सरकारचा मोठा खुलासा

PM Kisan 24th Installment Update: केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने देणार असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याबाबत आता सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.
PM Kisan 24th Installment

PM Kisan 24th Installment: Will Farmers Get ₹4,000 on Raksha Bandhan?

eSakal

Updated on

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23 व्या हप्त्यानंतर आता देशभरातील शेतकऱ्यांना 24व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचा दावा करण्यात आला असून या हप्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 4 हजार रुपये मिळतील, असेही व्हिडिओमध्ये सांगितले जात आहे. या दाव्यानंतर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यता जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com